न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जुलै २०२३) :- भोसरी येथील शास्त्री चौकातील आळंदी रोडवरील साधना सहकारी बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये आरोपीने (दि. १२) रोजी दुपारी २:५६ च्या सुमारास प्रवेश केला.
एटीएम मशीनमधील ज्या ठिकाणाहून पैसे निघतात, त्या ठिकाणच्या शटरशी छेडछाड केली. एटीएम मधील पैसे चोरी करण्याचा प्रयत्न केला. आरोपीच्या साथीदाराने एटीएम सेंटर बाहेर उभे राहुन टेहळणी करीत आरोपीला मदत केली.
फिर्यादी मयुर हेमंत राजपुरे यांनी आरोपी सोहेल सौराय खान, साजीद शरीफ खान (दोघेही रा. हरियाणा) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. भोसरी पोलिसांनी ५७५/२०२३, भा.द.वि. कलम ३८०, ४२७, ५११, ३४ अन्वये गुन्हा दाखल करीत दोघांना अटक केली आहे.














