न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जुलै २०२३) :- रिलायन्स स्मार्ट पॉईन्ट या दुकानातील चौघा कामगार आरोपींनी सिस्टीमला ट्रेनिंग मोड बिले व सस्पेंड बनवून दुकानातील सीसीटीव्ही फुटेजचा डीकीआर बंद करून ९,००,७४५ रूपये किंमतीच्या वेगवेगळ्या मालाची चोरी करून अपहार केला.
हा प्रकार (दि. ०१/०९/२०२२ ते १८/०६/२०२३) रोजी रिलायन्स मार्ट पॉईट दुकान, रोझे मेहर, मधुबन कॉलनी, रहाटणी येथे घडला. फिर्यादी अभिजीत राजू मिरेकर यांनी आरोपी विजय तुकाराम चकाले (वय २२ वर्षे रा सुंदर कॉलनी नं ०२ थेरगाव), रोहीत रघुनाथ कांबळे (वय २० वर्षे रा सोदर्या कॉलनी मेट्रो हॉस्पीटल शेजारी नखाते वस्ती), प्रशांत अच्युत पांचाळ (वय १९ वर्षे रा कुणाल हॉटेल समोर थेरगाव), संजीव पाठक (वय ३९ वर्ष रा गुलमोहर कॉलनी नखाते वस्ती रहाटणी), शिवकुमार सुरेश लोनार (वय २३ वर्षे सौदर्या कॉलनी मेट्रो हॉस्पीटल शेजारी नखाते वस्ती) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
वाकड पोलिसांनी ६६१/२०२३ भादवी कलम ३८१, ४०८, ३४ प्रमाणे आरोपींवर गुन्हा दाखल करीत चौघांना अटक केली आहे.














