न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जुलै २०२३) :- लाठया, काठया, शस्त्रे जवळ बाळगण्यास मनाई असताना एका आरोपीने त्याच्या कब्जात लोखंडी कोयता बाळगला. तसेच दुसऱ्या आरोपीने पिंपरी चिंचवड शहर पोलीस यांची व कोर्टाची कोणतीही परवानगी न घेता पोलीस उपआयुक्त परि. १, पिंपरी चिंचवड यांच्या हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून बेकायदेशीरपणे शहरात प्रवेश केला.
याप्रकरणी दिघी पोलिसांनी (दि. १२) रोजी रात्री ८. ०० च्या सुमारास रोड नं ८, बोपखेल येथे कारवाई करीत आरोपींना ताब्यात घेतले. यश ऊर्फ बबलू मारूती दिसले (वय २२ वर्षे, रा. कॉलनी नं. ०६, बोपखेल), कृष्णाकुमार यादव (रा. रोड नं.८, बोपखेल) असे अटक आरोपींची नावे आहेत.
दिघी पोलिसांनी ३००/२०२३ महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम १४२, ३७ (१) सह १३५ व शस्त्रअधिनियम १९५९ चे कलम ४(२५) नुसार आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.