न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जुलै २०२३) :- भारत विकास परिषद, पिंपरी – चिंचवड शाखा आणि एसकेएस फास्टनर लिमिटेड, चाकण यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
एसकेएस फास्टनर लिमिटेडचे संचालक राजीव अगरवाल, क्यूएमएस प्रमुख पवन गायकवाड, वित्त विभाग प्रमुख मुनिश राठी, मानव संसाधन विभाग प्रमुख विनोद शर्मा, क्यूएमएस उपव्यवस्थापक रामू नायडू यांनी परिश्रम घेऊन रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. त्याला प्रतिसाद देत एसकेएस फास्टनर लिमिटेडच्या वरिष्ठ अधिकारी आणि कामगारांनी मिळून १५८ बाटल्या रक्तदान करून मानवतेचे दर्शन घडविले.
भारत विकास परिषद सदस्य डॉ. दामोदर कुलकर्णी यांचे शिबिरासाठी विशेष सहकार्य लाभले. जनकल्याण रक्तपेढीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. काळे, रक्तपेढी अधिकारी डॉ. संतोष अनगोळकर आणि त्यांच्या वैद्यकीय समूहाने उत्तम नियोजन करून रक्त संकलित केले.
याप्रसंगी भारत विकास परिषद, पिंपरी – चिंचवड शाखाध्यक्ष डॉ. रामचंद्र आपटे यांच्या हस्ते एस के एस फास्टनर लिमिटेड कंपनीला स्मृतिचिन्ह आणि गौरवपत्र प्रदान करण्यात आले; तसेच रक्तदात्यांना सहभाग प्रमाणपत्रांचे वितरण करून सन्मानित करण्यात आले. क्यू एम एस प्रमुख पवन गायकवाड यांनी आभार मानले.