न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जुलै २०२३) :- भोसरीतील इंद्रायणीनगर येथील कॅनरा बँक एटीएम सेंटरमध्ये (दि. १६) रोजी पहाटे ३.१५ च्या सुमारास एटीएम मशीनचा दरवाजा लोखंडी रॉडच्या सहाय्याने उचकटुन चोरीचा प्रयत्न केला.
या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी आरोपीच्या विरोधात ३०४/२०२३ भा.दं.वि कलम ३८०, ५११, ४२७ नुसार गुन्हा दाखल केला आहे. एकनाथ त्रिबंक लंके (रा. इंद्रायणीनगर, भोसरी) असे अटक आरोपीचे नाव आहे.