न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जुलै २०२३) :- चौघांनी पैशांसाठी खोटया लग्नाचा बनाव रचला. फिर्यादी व त्यांच्या कुंटुंबियांचा विश्वास संपादन केला. आरोपीचे फिर्यादी सोबत लग्न लावुन देवुन फिर्यादी यांनी त्या लग्नासाठी ३,००,००० रुपये लग्नाचा व एजंटचा खर्च करुन फिर्यादी यांची आर्थिक फसवणुक केली आहे.
हा प्रकार (दि. १२ ते आजपर्यंत) कोयते वस्ती, पुनावळे आणि इंदौर या ठिकाणी घडला. फिर्यादी दिनेश जवाहरलाल औस्तवाल यांनी महीला आरोपी, अजय रोहन यादव, राकेश सिसोदिया, महीला आरोपी यांच्या विरोधात फिर्याद आली आहे. \
रावेत पोलिसांनी आरोपींच्या विरोधात २५६ / २०२३ भा.द.वि. कलम ४२०, ४०६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला असून एकाला अटक केली आहे.














