न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जुलै २०२३) :- विधी संघर्षत बालकांसाठी (दि. १८) रोजी स्माईल फाउंडेशन, संदेश बोर्ड फाउंडेशन, होम (संवाद समुपदेशन केंद्र) या सहयोगी अशासकीय संस्थाचे मदतीने विशेष जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमास पिंपरी, चिंचवड, निगडी या भागातील विधीसंघर्षित बालके व त्यांचे पालक (आई-वडील नातेवाईक) असे एकूण १४० उपस्थित होते. उपस्थितांना स्माईल फाउंडेशनचे अमोल कुलकणी, हर्षल जोशी, तेरे देस होम (संवाद समुपदेशन केंद्र) चे गजानन कोरडे, संदेश बोर्ड फाउंडेशनचे संदेश बोर्ड तसेच सहायक पोलीस आयुक्त सतीश कसबे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम गुन्हे शाखा युनिट २ यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
या दिशा उपक्रमात जागृती कार्यक्रम पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सहआयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त स्वप्ना गोरे (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस आयुक्त सतीश कसबे (पिपरी विभाग) व वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम गुन्हे शाखा युनिट २, पोउपनि माने, सपोफी चौधरी, पोहवा तांबोळी, पोलीस अंमलदार सानप व विशेष बाल पोलीस पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्रीसंत निकम, सोना शिर्के, पोलीस अमलदार मुठे, पोलीस लोहार यांनी यशस्वीरित्या पार पाडला.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाअंतर्गत विशेष बाल पोलीस पथकामार्फत बालकांच्या उज्वल भविष्यासाठी “दिशा” हा उपक्रम पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात दिड वर्षापासून सुरु करण्यात आलेला आहे. पोलीस ठाणे स्तरावर दाखल होणा-या विविध गुन्ह्यामध्ये अल्पवयीन बालकांचा सहभाग दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये प्रामुख्याने बालकांचे गुन्ह्याकडे वळण्यांचे प्रमाण अधिक असून कळत नकळत गुन्हेगारी मार्गावर गेल्याचे दिसुन येत आहे.
या अनुषंगाने पिपरी चिचवड पोलीस आयुक्तालयामध्ये विशेष बाल पथकाव्दारे सर्व पोलीस स्टेशन स्तरावर राबविण्यात येणा-या “दिशा” या उपक्रमांतर्गत बालकांना त्यांचे भविष्याच्या दृष्टीकोनातून मार्गदर्शन व समुपदेशन करून योग्य प्रवाहात आणण्यासाठी सहयोगी अशासकीय संस्था व त्याचे प्रतिनिधी तसेच एकूण २७३ महिला/गृहीणी समिती सदस्य, क्रिडा समन्वयक, शिक्षण समन्वयक आणि व्यसनमुक्ती समन्वयक असे एकुण १८५ समन्वयकाची पोलीस ठाणे स्तरावर नेमणुक करण्यात आली असुन प्रभागानुसार एक पोलीस अधिकारी समन्वयक म्हणून नेमणुक करण्यात आलेला आहे. विधीसंघर्षित बालकाचे पुर्नवसन करणे असे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे.
पिपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील विशेष बाल पथकाच्या मार्फत सर्व पोलीस स्टेशन स्तरावरील सर्व भागात तेरे देस होमस जर्मनी, होपस फॉर द चिल्ड्रन फाउंडेशन, मुस्कान फाउंडेशन, संदेश बोर्ड स्पोर्टस फाउंडेशन, आरोग्य मित्र फाउंडेशन, विमल व्यसनमुक्ति फाउंडेशन, स्माईल फाउंडेशन, न्यू बिजन फाउंडेशन अशा एकुण ०८ सहयोगी अशासकीय संस्थांच्या मदतीने “दिशा” हा उपक्रम संपूर्ण शहरात राबविण्यात येत आहे.
दिशा उपक्रम अंतर्गत केलेली कामगिरी…
• पिपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये आतापर्यंत एकूण ४२० विधसंघर्षितः बालकांना समुपदेशन करून मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले आहे.
• एकूण ७ बालकांना व्यावसायिक प्रशिक्षण देवून स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याची संधी उपलब्ध करून दिली.
• एकूण २४ बालकांना शाळेत प्रवेश मिळवून दिला, ते शिक्षण घेत आहेत.
• एकुण १२ विधीसंघर्षग्रस्त बालकांनी कोहिनुर इन्स्टीटयूट, चिंचवड येथे इलेक्ट्रीकल वायरमन कोर्स पूर्ण केले.
• एकूण ०७ बालकांसाठी मोबाईल दुरूस्ती कोर्स/प्रशिक्षण देण्यात आले आहे.
• निगडी, दिघी व निगडी पोलीस स्टेशन येथे बालस्नेही कक्षाची स्थापना करण्यात आली असून तेथे विधीसंघर्षग्रस्त बालके व पोक्सो गुन्हयातील १८ वर्षाखालील पिडित बालकांचे समुपदेशन करण्यात येत आहे.
• बालकासाठी पोक्सो कायदयाची माहिती बालकांचे शिक्षण, व्यसनाचे दुष्परिणाम या विषयावर एकूण १४ पथनाटय ६ शैली असे जनजागृती कार्यक्रम, दैनंदिन जीवन कौशल्य विकास कार्यक्रम, व्यसनमुक्तिना कार्यक्रम, शिक्षण जनजागृती रैलीचे आयोजन असे एकूण १०४ जनजागृतीचे कार्यक्रमात आलेले आहे. तसेच एकूण ३३ व्यसनमुक्ती शिबीरे घेण्यात आलेली आहेत.
• मनोधैर्य योजनेसाठी पाठपुरावा करण्यात येत असुन पोक्सो गुन्हयामधील एकुण २ गुन्हयामध्ये सपोर्ट पर्सन म्हणून कामकाज करून घेण्यात येत आहे.
• एकुण १२० विधीसंघर्षग्रस्त बालकांसाठी निगडी ओटा स्किम येथे क्रिडा प्रशिक्षण देण्यात येत आहे.
• व्यसनाच्या आहारी गेलेल्या बालकांकरिता पिंपरी व निगडी येथे व्यसनमुक्ति केंद्र स्थापन करण्यात आले असून व्यसनाच्या आहारी गेलेल्या एकुण ३५ बालकांना मोफत उपचार व समुपदेशन करण्यात आले आहे.
• पिपरी चिंचवड शहरातील एकूण ३५ फासे पारधी समाजाच्या मुलांचे जातीचे दाखले काढणेसाठी पाठपुरावा करण्यात आलेला आहे.
तसेच यापुढेही संपूर्ण पिपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या दिशा उपक्रम अंतर्गत बालकांचे उन्नत भविष्यासाठी शहरातील सहयोगी अशासकीय संस्थांचे मदतीने जास्तीत जास्त जनजागृती शिबीराचे कार्यक्रमाचे आयोजन करुन अशा बालकांना योग्य दिशा दाखविण्याकरीता पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय नेहमीच कटिबद्ध असणार आहे.














