- नियमांचे पालन न करणाऱ्या चालकांवर कठोर कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जुलै २०२३) :- पीएमपीच्या बीआरटी बसस्थानकावर किमान दहा सेकंद किंवा प्रवाशांची चढ-उतार झाल्यानंतरच बस मार्गस्थ करण्याचे आदेश पीएमपी प्रशासनाने दिले आहेत. तसेच नियमांचे पालन न करणाऱ्या चालकांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपीएमएल) पुणे, पिंपरी शहर आणि पीएमआरडी हद्दीत ३७९ मार्गावर सेवा दिली जाते. पीएमपीतून दररोज आठ ते दहा लाख प्रवासी प्रवास करतात. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत सात बीआरटी कॉरिडोर आहेत. बीआरटी मार्गावर ७६२ बस संचलनात आहेत. बीआरटी मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बऱ्याच वेळा
बसस्थानकात बस थांबली नाही, बसमध्ये चढण्याअगोदरच बस मार्गस्थ झाली, काहीजण बसमध्ये | आणि काहीजण खाली किंवा प्रवासी बसमध्ये चढ-उतार करण्याअगोरच बस मार्गस्थ झाल्याच्या तक्रारी आहेत. तसेच बीआरटी मार्गात प्रवासी पडून गंभीर जखमी झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. चालकांविरोधात अनेक वेळा तक्रार करूनदेखील चालकांची मुजोरी थांबत नव्हती.
प्रत्येक बीआरटी मार्गावर एक फिल्ड ऑफिसर नेमला आहे. त्यांच्यामार्फत विविध बस स्थानकांवर थांबून तपासणी मोहीम हाती घेतली आहे.
– अनंत वाघमारे, बीआरटी प्रमुख…














