- महापालिकेची सांगवी पोलिस ठाण्यात तक्रार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जुलै २०२३) :- पवना नदीपात्रालगत दोन टेम्पो व ट्रॅक्टरच्या सहाय्याने आरोपींनी नदीच्या निळ्या पुररेषेमध्ये बिगर परवाना अनाधिकृतपणे राडारोडा टाकला. सार्वजनिक नदीचे पाणी दुषित केले.
ही घटना (दि. २२) रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास हॉटेल राधाकृष्णच्या बाजुला, महाराजा हॉटेलच्या समोर, पिंपळे गुरव येथील पवना नदीपात्रालगत नदीच्या निळी पुररेषेमध्ये घडली.
फिर्यादी अमोल गणपत गोरखे (पिंपरी चिंचवड महानगरपालिका) यांनी आरोपी नागनाथ अंबादास मंजुळकर (वय ५५ वर्षे, धंदा चालक, रा. नवनाथ सोसायटी मागे, जनवाडी, चतुःशृंगी, पुणे), शिवाप्पा लकप्पा पुजारी (वय ३२ वर्षे, धंदा चालक, रा. सदर), हनुमंत पटलाप्पा पवार (वय ३२ वर्षे, धंदा चालक, रा. वेताळ महाराज झोपडपट्टी, माकन चौक, जुनी सांगवी) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
सांगवी पोलिस ठाण्यात ३५२ / २०२३, भा.दं.वि कलम २७७, पर्यावरण सरंक्षण अधिनियम १९८६ चे कलम १५ व महाराष्ट्र महानगर पालिका अधिनियम ३७६ (अ) नुसार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी ताब्यात आहेत. पुढील तपास मपोहवा साबळे हे करीत आहेत.














