- या फेक औषधाची विक्री करून रुग्णांची व शासनाची केली फसवणूक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जुलै २०२३) :- आपआपसात संगणमत करून आरोपींनी Globucel10, 10gm in 100ml Solution (Human Normal Immunoglobulin for Intravenous Use I.P. 10% Solution), Batch No. 97130121 हे बनावट औषध तयार केले. त्याचे खोटे बनावट बिले तयार केली. ही औषधे जवळ बाळगुन खरे असल्याचे भासवले. त्याची विक्री करुन जनतेची, रुग्णांची व शासनाची फसवणूक केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. २९/०६/२०२३ ते दि. २०/०७/२०२३) दरम्यान व त्यापुर्वी एकांश ट्रेडर्स प्रॉपर्टी, हिस्सा नं ११, बी व १२३, भुमकर चौक व इतर वेगवेगळ्या ठिकाणी घडला.
अन्न व औषध प्रशासनाने आरोपी सतीष रमेश चौहान (शॉप नं १०९ पहीला मजला क्रॉस रोड भुमकर चौक वाकड), श्रीकंदर पुजारा (सक्षम व्यक्ती व मालक, मे सागर मेडीसीन एफ २७ जीएफ सचिन टॉवर जवळ अहमदाबाद), लोकेश सुकनिया खंडेलवाल (मालक व सक्षम व्यक्ती दुसरा मजला गांधी टॉवर राजस्ठान, जोधपुर), आदीत्य कृष्ण (भागीदार पॉप्युलर मेडीसीन स्पेशालिस्ट, नई बाजार, जुमा मस्जिद जवळ, बिहार), कामथ ड्रग एजन्सी (तळ मजला कामोठे, पनवेल), अज्ञात व्यक्ती व इतर संस्था यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
वाकड पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध ७०४/२०२३ भा.दं.वि. कलम ४२०, ४६८, ४०१,२७६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आहे. घटनेचा पुढील तपास मपोउपनि गोडे हे करीत आहेत.














