- लोकनेते स्व. लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या आमदार निधीतील विकासकामांना प्रारंभ..
- आमदार अश्विनीताई लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते प्रकल्पांचे भूमिपूजन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जुलै २०२३) :- वाकड परिसरातील नागरिकांना विविध सुविधा पुरविताना सांस्कृतिक भवन व योगा भवनची गरज लक्षात घेता वाकड परिसरात सांस्कृतिक भवन व योगा भवन उभारण्यात यावे, अशी इच्छा माजी नगरसेवक विनायक गायकवाड यांनी लोकनेते स्व. लक्ष्मणभाऊ जगताप यांच्याकडे व्यक्त केली होती. त्या अनुषंगाने तत्काळ लोकनेते तत्कालीन आमदार स्व. लक्ष्मणभाऊ जगताप यांनी सांस्कृतिक भवन व योगा भवन प्रकल्प उभारण्याच्या दृष्टीने आपल्या आमदार निधीतून प्रकल्प उभारण्यासाठी पाठपुरावा केला व हा प्रकल्प मंजूर करून घेतला होता. तद्नंतर आमदार अश्विनीताई लक्ष्मण जगताप यांनी पाठपुरावा करीत या कामास प्रारंभ केला आहे.
यावेळी आमदार अश्विनीताई जगताप म्हणाल्या की, “साहेबांनी वाकड परिसरातील नागरिकांचा विचार करिता त्यांच्या सोयीचे, आवडेल असे, सोयी सुविधायुक्त व अद्ययावत असे सांस्कृतिक भवन व योगा भवन साकारण्यासाठी पाठपुरावा व प्रयत्न केले होते. आज या प्रकल्पांचे भूमिपूजन होत आहे व लवकरच येथील नागरिकांना हे प्रशस्त असे प्रकल्प अनुभवायला मिळेल.”
माजी नगरसेवक विनायक गायकवाड म्हणाले, “आज स्व. भाऊंच्या निधीतील विकास प्रकल्पांचे भूमिपूजन होत असताना लक्ष्मणभाऊंची साथ आजूनही माझ्या सोबत आहे, याची अनुभूती माझ्यासारख्या कार्यकर्त्यास नक्कीच आली. ते हयात असताना भाऊंसमोर मी जेव्हा ही कल्पना मांडली, तेव्हा त्यांनी तत्काळ आपल्या आमदार निधीतून अद्ययावत अशा प्रकल्प उभारणीसाठी पाठपुरावा केला होता. पुढे अश्विनीवहिनींनी देखील पाठपुरावा करीत हे काम चालू करून घेतले व लवकरात लवकर हे प्रकल्प पूर्ण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.”
या प्रसंगी स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सौ. ममताताई विनायक गायकवाड, माजी नगरसेवक विनायक गायकवाड, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्या भारती विनोदे, भाजपा शहर उपाध्यक्ष राम वाकडकर, मा. नगरसेविका श्रीमती आरती चोंधे, त्याचप्रमाणे पिंपळे निलख, विशाल नगर, वाकड परिसरातील ज्येष्ठ नागरिक संघांचे सदस्य, विविध सोसायटी मधील सदस्य व परिसरातील नागरिक उपस्थित होते.














