- आग लागल्याचे पाहताच लोक सैरावैरा पळत सुटले…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहुगांव वार्ताहर (दि. २३ जुलै २०२३) :- देहूगाव-येलवाडीतील सांगुर्डी फाट्यावर आज रविवारी (दि. २३) रोजी भररस्त्यात किरणा दुकानासमोरच घरगुती छोट्या सिलेंडरला आग लागली. पेटता सिलेंडर वर्दळीच्या रस्त्यावर आणून टाकून देण्यात आला होता. आग लागल्याचे पाहताच लोक सैरावैरा पळत सुटले.
येलवाडी-चाकण रस्त्यावर नेहमीच वाहतुकीची गर्दी असते. पेटत्या सिलेंडरचा केव्हाही स्फोट होऊ शकतो, हे माहित असताना देखील वाहनचालक जीव मुठीत घेऊन वाहनातून ये-जा करीत होते.
रस्त्यावर बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. तेथे आगीपासून संरक्षणासाठी कोणतीही यंत्रणा नसल्यामुळे लोकांनीच त्या पेटत्या सिलेंडरवर माती टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला.














