- त्रिवेणीनगरमधील घटना; जमावावर चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जून २०२३) :- ऑफीसमध्ये असताना फिर्यादीच्या साईटवर वॉचमनने ‘आपल्या प्लॉटमध्ये एका महिलेसोबत १० महीला व ५ पुरुष आले आहेत, त्यांनी काम थांबवीले आहे, अशी माहिती दिली. फिर्यादी हे स्वतः त्या ठिकाणी गेले. त्यावेळी ‘तुम्ही काम थांबवा, हा प्लॉट माझा आहे, नाहीतर मी सदर ठिकाणी आत्मदहन करेन’ असे आरोपी फिर्यादीला म्हणाली.
आरोपी महीला व इतरांनी मिळुन फिर्यादीच्या प्लॉटमध्ये अतिक्रमण करुन शिवीगाळ व धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. ही घटना (दि. २३) रोजी दुपारी ४.०० वाजता गट नं १६४, त्रिवेणीनगर, तळवडे येथे घडली.
फिर्यादी गंगाधर रमेश भालेकर यांनी महिला आरोपी व इतर (१० महीला व ५ पुरुष) यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे. चिखली पोलिसांनी आरोपींवर ४६४ / २०२३ भा.द.वि. कलम १४१.१४३, १४९, ४४७, ५०४, ५०६, प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पोउपनि कुदळे हे करीत आहेत.














