न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जुलै २०२३) :- डांगे चौकातून भाजीपाला घेवुन फिर्यादी ताथवडे येथील त्यांच्या घरी पायी जात होते. त्यावेळी आरोपी व दोघे सह आरोपी विधीसंघर्षित बालक यांनी फिर्यादीला आडवुन तोंडात थापड मारली. धाक दाखवून फिर्यादीकडील १,००० रुपये जबरदस्तीने काढुन घेतले, असे फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि. २३) रोजी रात्री ८.०० च्या सुमारास रघुनंदन मंगल कार्यालयासमोर, ताथवडे येथे घडला. फिर्यादी योगेंद्र सौरप्रसाद भारती (वय २८ वर्षे, धंदा मजुरी, रा. ताथवडे) यांनी आरोपी अजय शंकर शर्मा, विधीसंघर्षित बालक, विधीसंघर्षित बालक यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
वाकड पोलीस ठाण्यात ७२६/२०२३ भा.दं.वि कलम ३९२,३४ अन्वये आरोपींवर गुन्हा दाखल करीत एकाला अटक केली आहे. पुढील तपास सपोनि ठाकुर हे पाहत आहेत.