न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जुलै २०२३) :- एका वर्षांकरीता तडीपार केलेला आरोपी कोणतीही कायदेशीर पूर्व परवानगी न घेता तडीपार आदेशाचा भंग करून शहरात आला. सोबत त्याने लोखंडी कोयता जवळ बाळगला.
पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकच्या गुन्हे शाखेने (दि. २६) रोजी ८.२० च्या सुमारास कुणाल रेसीडेन्सी शेजारी, मॉन्जीनिस बेकरी जवळ, थेरगाव येथून आरोपीला ताब्यात घेतले.
आकाश रंगनाथ चव्हाण (वय २६ वर्षे, रा. दुर्गा हॉटेलसमोर, काळाखडक झोपडपटटी, वाकड) असे अटक आरोपीचे नाव आहे. हिंजवडी पोलीसा ठाण्यात आरोपीविरुद्ध ७२५/२०२३ भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५), म.पो. अॅक्ट कलम ३७ (१) (३) सह १३५,१४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि ठाकुर हे पुढील तपास करीत आहेत.















