न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. १ एप्रिल) :- बालेवाडी येथे झालेल्या वाको इंडिया राष्ट्रीय किकबॉक्सिंग फेडरेशन कप स्पर्धेत संत तुकारामनगर येथील आर्यन्स मार्शल आर्ट्स संस्थेच्या शरयू संतोष म्हात्रे हिने चौरंगी मुकूट पटकाविला.
शरयू ने ७ ते ९ या वयोगटात सहभागी होऊन हार्ड स्टाईलकरीता सुवर्णपदक, हार्ड स्टाईल वेपंन्स सुवर्णपदक, पाॅईन्ट फाईट रोप्यपदक, लाईट काॅन्टॅक्ट कास्यपदक अशी एकूण चार पदके जिंकून आर्यन्स मार्शल आर्ट्सचे तसेच महाराष्ट्रचे नाव उंचावले आहे.
आर्यन्स मार्शल आर्ट्स ने या स्पर्धेत एकूण २८ सुवर्णपदके, २० रौप्यपदके व १९ कास्यपदके एकूण ६७ पदके पटकावली. भारतातून २७ राज्यातून तब्बल ११३६ खेळाडू, या स्पर्धेसाठी आले होते. महाराष्ट्र संघाने कॅडेट, ज्युनिअर, सिनियर तिन्ही गटाचं विजेतेपद पटकावले तसेच मानाचं फेडेरेशन कप पटकाविला.
सर्व विजेत्यांना राष्ट्रीय अध्यक्ष संतोष अग्रवाल, महाराष्ट्राचे चेअरमन संतोष बारणे तसेच महाराष्ट्र अध्यक्ष संतोष म्हात्रे यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. सर्व विजेत्या खेळाडूंना संस्थेचे मुख्य प्रशिक्षक संतोष म्हात्रे, सागर कोळी,प्राची सुतार, मोहीन बागवान, विजय ढोबळे,शुभम कानडे,बिना नेगी यांचे प्रशिक्षण लाभले.











