न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ एप्रिल) :- डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे अंतर्गत डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्र, पिंपरी, पुणे येथे दोन दिवसांच्या (३० व ३१ मार्च २०१९ ) आंतराराष्ट्रीय स्टेम सेल परिषदचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेचा विषय स्टेम सेल ची उत्क्रांती आणि जीवशास्त्रामध्ये केला जाणारा त्यांचा उपयोग व रिजेनेरेटिव्ह मेडिसिन हा होता. स्टेम सेल बायोलॉजि विषयातील तंत्रावर वैचारिक देवाणघेवाणीवर या परिषदेत चर्चासत्र आयोजित केले होते.
परिषदेचे उदघाटन पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील, माजी राज्यपाल त्रिपुरा, बिहार यांच्या हस्ते करण्यात आले. या क्षेत्रातील पुढील वाटचाली साठी सहभागी शास्त्रज्ञ आणि विद्यार्थाना त्यांनी शुभेच्छा दिल्या. उदघाटन सोहळ्यासाठी कुलपती डॉ. पी. डी. पाटील, भाग्यश्री पाटील, उपाध्यक्षा, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, डॉ. यशराज पाटील विश्वस्थ आणि कोषाध्यक्ष डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ हे उपस्थित होते.
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुुुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांनी विद्यापीठातील रिजेनेरेटिव्ह मेडिसिन लॅबोरेटरी विषयी माहिती देऊन, विद्यापीठातील संशोधन आणि संदर्भातील सुविधांची माहिती दिली. डॉ. ब्रिगेडियर अमरजित सिंग, आणि डॉ. जे. एस. भवाळकर (अधिष्ठता ) डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्र, पिंपरी, पुणे उपस्थित होते.
या परिषदेचा उद्देश आंतराराष्ट्रीय पातळीवरील संशोधक, डॉक्टर्स आणि विद्यार्थी यांना एकामंचावर आणून स्टेम सेल बायोलॉजि विषयी ज्ञानाचे संधारण आणि सामायिकीकरण करण्याचा होता. या परिषदेच्या आयोजनात डॉ. रमेश भोंडे, डायरेक्टर रिसर्च, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, डॉ. अनंत बागुल आयोजन समिती अध्यक्ष, डॉ. मनीष खन्ना चेअरपर्सन (ISCSG) आणि डॉ. मनोज बनसोडे आयोजन समिती सचिव यांचा सहभाग होता.











