न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जुलै २०२३) :- पुसाणे गावच्या नदीच्या कडेला मोकळया जागेत एचपी गॅस गोडावनच्या उजव्या बाजुला आडोषाला बेकायदेशीरपणे हातभटटी तयार करण्यासाठी गुळमिश्रत पाणी व तयार हातभटटी असा एकूण २,५५,५०० रूपये किंमतीचा प्रोव्हिविशनचा माल आरोपीने जवळ बाळगला.
पोलिसांनी (दि. २७) रोजी दुपारी १.४५ च्या सूमारास कारवाई केली. शिरगाव पोलिसांनी १९८/२०२३ महा दारुबंदी अधि. कलम ६५ ( क ) (फ) नुसार आरोपी सनी भारत राठोड (वय २१ वर्षे, पुसाणे ता मावळ जि पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला सी.आर.पी.सी. ४१ (अ) (१) प्रमाणे नोटीस देण्यात आली आहे. पोना चौधरी हे घटनेचा तपास करीत आहेत.















