न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जुलै २०२३) :- ‘तु माझ्यासोबत संबंध ठेव, नाहीतर तुझे दुकान चालू देणार नाही’ अशी धमकी आरोपीने फिर्यादी महिला काम करीत असलेल्या दुकानात येऊन त्यांना दिली. त्यावेळी फिर्यादी त्याला ‘येथून बाहेर निघून जा’ असे म्हणाल्या असता त्याने फिर्यादीचा हात पकडला. फिर्यादी यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करुन फिर्यादी यांचा विनयभंग केला. फिर्यादी व कामगार जोरात ओरडल्याने दुकानाशेजारील टेलर त्यांच्या मदतीला आल्यानंतर आरोपी पळून गेला. त्यानंतर पून्हा फिर्यादीच्या घरासमोर येऊन फिर्यादीच्या पतीस ‘तुझी बायको काय चालीची आहे, मला माहीत आहे’ असे म्हणून तुझा गेम करतो, तुला संपवतो अशी धमकी दिली.
ही घटना (दि. २६) रोजी सकाळी १०.३० च्या सुमारास फिर्यादी यांच्या घरासमोर व लेडिज वेअर दुकानमध्ये घडली. महिला फिर्यादी यांनी आरोपी सुभाष शरीराव शिंदे (रा. मोशी) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
भोसरी पोलिसांनी ६१८/२०२३, भा.दं.वी. क ३५४, ३५४(अ), ३५४ (४), ५०४, ५०६ नुसार आरोपींवर गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली आहे. पोउपनि केंद्रे पुढील तपास करीत आहेत.















