न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जुलै २०२३) :- कंपनीत आरोपी हा काम व्यवस्थीत करीत नाही, म्हणुन फिर्यादी यांनी एचआरकडे तक्रार केली होती. त्याचा राग मनात धरुन आरोपी व त्याच्या दोन मित्रांनी मिळुन फिर्यादी यांना शिवीगाळ करुन, लाकडी काठीने, तसेच लाथाबुक्याने मारहाण करुन त्यांना दुखापत केली.
‘तुला ठेवतच नाही’ अशी धमकी दिली. तसेच फिर्यादीच्या दुचाकीच्या पेट्रोल टाकीवर, मिटर काटयावर, इंडीकेटर स्विचवर दगड मारुन चेपुन व मोडतोड करुन तिचे नुकसान केले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. ही घटना (दि. २६) रोजी रात्री ९:०० च्या सुमारास निघोजेतील महिंद्रा कंपनीच्या गेट नं. २ समोर, ता. खेड, येथे घडली.
फिर्यादी सोमेन शंकर माल यांनी आरोपी गणेश गायकवाड व त्याचे दोन मित्र यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. म्हाळुंगे एमआयडीसी पोलीसांकडुन ४३२ / २०२३ भा.दं.वि. कलम ३२४, ३२३, ४२७, ५०४, ५०६, ३४ अन्वये आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोना सोनवणे हे करीत आहेत.















