न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जुलै २०२३) :- घरासमोर पार्क केलेली फिर्यादी यांची तीन लाखांची ईको गाडी (एमएच१४जेआर९८७७) व गाडीच्या डीकीमधील कागदपत्रं कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी करुन नेली आहेत.
चोरीचा हा प्रकार (दि २७) रोजी १.३० वा ते सकाळी ०६.०० च्या दरम्यान बधलवाडी, नवलाख उंब्रे, ता मावळ जि पुणे येथे घडला. फिर्यादी गणपत रामचंद्र जाधव (वय ३३ वर्षे, व्यवसाय शेती रा. बधलवाडी नवलाख उंब्रे) यांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
तळेगाव एमआयडीसी पोलीसांकडुन १७२ / २०२३ भारतीय दंड संहिता कलम ३७९ अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोफी चासकर हे करीत आहेत.















