न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जूलै २०२३) :- महिंद्रा कंपनीच्या टॅक्टरने फिर्यादीच्या मालकीची व सह आरोपी यांच्या मालकीच्या शेताची परवानगीशिवाय नांगरट केली. त्यामुळे त्यांचे नुकसान झाले आहे. तसेच आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करून बघुन घेण्याची धमकी दिलेली आहे, असं फिर्यादीत म्हटलं आहे.
हा प्रकार (दि. १६) रोजी ५.०० वाजताचे सुमारास तळेगाव दाभाडे, ता. मावळ, पुणे येथील गट क्र. ३३३ आणि गट क्र. ३३४ / १ मधील शेताचा गट क्र. ३३३ आणि गट क्र. ३३४/१ मध्ये घडला आहे.
फिर्यादी बळीराम गरूड (वय ४७, व्यवसाय शेती, रा. २७८, शनिवार पेठ, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि.पुणे) यांनी आरोपी सागर बारकु भेगडे (वय ३० वर्शे, रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे), गणेष वसंतराव खांडगे (वय ५२, रा. फ्लोरा सिटी, तळेगाव दाभाडे ता. मावळ, जि. पुणे) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
तळेगाव दाभाडे पोलीसांकडुन ३६१ / २०२३ भादवि कलम ४४७, ४२७, ५०४, ५०६ नुसार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोउपनि मदेवाड हे पुढील तपास करीत आहेत.















