न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जूलै २०२३) :- बँकेने कायदेशीरपणे ताबा घेतलेल्या मिळकतीमध्ये आरोपीने बेकायदेशीरपणे प्रवेश केला. त्या ठिकाणी आरोपी राहत आहेत. ही घटना (दि. ०२) ते अदयापर्यंत सर्व्हे नंबर ३७, हिस्सा नंबर ०३, प्लॉट नंबर ०४, गुरुद्वारासमोर, वाल्हेकरवाडी येथे घडली.
फिर्यादी रवी प्रल्हाद बागडे यांनी आरोपी रुथ विन्सेंट लोबो (वय ३८ वर्षे) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चिंचवड पोलीसांकडुन ३३८ / २०२३ भादवी कलम ४४८ प्रमाणे आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोउपनि व्हरकाटे घटनेचा पुढील तपास करीत आहेत.















