न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 1 ऑगस्ट 2023) :- रात्रीची डयुटी चुकविण्यासाठी आरोपीने चाकु लावुन जबरी चोरीची खोटी तक्रार दिघी पोलीस ठाण्यात दिली होती. पोलीसांच्या तपास पथकाने गुन्हयाची उकल करुन खोटी तक्रार देणाऱ्या फिर्यादी आरोपीकडुन दिघी पोलीसांनी मोबाईल जप्त केला असुन कायदेशीर कार्यवाही सुरू केली आहे.
विश्वास मराठे (वय ३६ वर्षे, रा. चिखली) अशी खोटी फिर्यादी देणाऱ्या आरोपीचे नाव आहे.
या प्रकरणाची माहिती अशी, दुचाकीवरून राहत्या घराकडे आरोपी फिर्यादी जात होते. वडमुखवाडी चौकाच्या पुढे दिघी आळंदी रोडवर नारंगी व काळया रंगाच्या दोन केटीएम ड्युक मोटार सायकल वरील चार चोरट्यांनी फिर्यादी यांना आडवले. त्यांच्या कंबरेला दोघांनी चाकू लावून खिशातील ४,००० रू. कि. चा रेडमी कंपनीचा निळया रंगाचा मोबाईल जबरदस्तीने काढून तसेच खिशातील पाकीट त्यामध्ये असलेले कागदपत्रे जबरदस्तीने चोरून नेले. या प्रकरणी फिर्यादीने पोलीस ठाण्यात फिर्याद दीली. त्यानुसार दिघी पोलीस ठाण्यात गु. रजि नं. २९२ / २०२३ भादवि कलम ३९२, ३४ अन्वये (दि. 7) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्हयाच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी घटनास्थळावरील तसेच आजुबाजुचे सिसिटीव्ही कॅमेरे चेक केले असता दोन केटीएम गाडया एकामागुन एक गेल्याचे त्यांना दिसत नव्हते. तसेच आरोपीबाबत कुठलीही माहिती प्राप्त झाली नव्हती. तसेच फिर्यादी यांनी जाणूनबुजुन त्यांच्याकडील आयएमईआय क्रमांक दिला नव्हता. फिर्यादीने दिलेल्या मोबाईल नंबरचे तांत्रिक विश्लेशन केले असता सदरचा मोबाईल फिर्यादीच वापरत असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने फिर्यादी यांना तपासकामी पोलीस ठाणे बोलावले होते. फिर्यादी यांचेकडे तपास केला असता त्यांनी ते १३ तास ड्युटी करतात तसेच त्यांना डयुटीकरीता कंपनी कोणीही मदतीस माणुस देत नव्हते. त्यांच्या डयुटीचा टायमिंग जास्त होता. त्यांच्या ड्युटीचा वेळ कमी व्हावा व रात्रपाळी डयुटी देण्यात येवु नये याकरीता फिर्यादी यांनी पोलीसात खोटी तक्रार दिल्याचे तपासात सांगितले. तसेच फिर्यादीकडुन ४,००० रू. कि. चा रेडमी ९ कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला असुन त्याच्याविरोधात खोटी तक्रार दिल्याने पुढील कायदेशिर कार्यवाही पोलीस करत आहेत.
सदरची कारवाई पोलीस उपायुक्त परीमंडळ ०१ विवेक पाटील सहायक पोलीस आयुक्त चाकण विभाग, राजेंद्रसिंह गौर, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, दिघी पोलीस ठाणे मच्छिंद्र पंडीत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) दशरथ वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली दिघी पोलीस ठाण्याचे तपास पथकातील सुनिल भदाणे, पोलीस उप निरीक्षक, पोहा ७१३ चिंतामण फलके, पोहा ८०१ प्रदीप पोटे, पोहा १०२० किशोर कांबळे, पोहा ११६८ सतीष जाधव, पोहा ९५३ शरद विंचु पोना १५७२ किरण जाधव, पोशि २०९४ बाबाजी जाधव व पोशि ३३९१ शशिकांत भोसले व पोशि ३५५३ उमेश कसबे यांनी केली.















