- टेम्पो चालक पसार; तळेगाव एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ जुलै २०२३) :- टाटा कंपनीचा विटकरी रंगाच्या टेम्पोवरील अज्ञात चालकाने त्याचा टेम्पो हा इंदोरीगावच्या हद्दीतील हॉटेल शिवप्रसादजवळ, तळेगाव दाभाडे-चाकण रोडवर (दि. २५) रोजी १०.०० च्या सुमारास भरधाव वेगात रस्त्याच्या परिस्थितीतीकडे दुर्लक्ष करुन राँग साइटला जावुन चालवला.
दरम्यान समोरुन येणा-या बजाज पत्सर १५० सीसी दुचाकीला धडक देउन अपघात केला. अपघातात दुचाकीस्वार गिता रामकल्याण सोनवणे यांना गंभीर व किरकोळ दुखापत आणि सुरेश होनाजी दाभाडे यांना गंभीर व किरकोळ दुखापत करून त्यांच्या मूत्युस आणि दुचाकीच्या नुकसानीस कारणीभूत झाला.
फिर्यादी अरुण मधुकर दाभाडे यांनी आरोपी टाटा कंपनीचा विटकरी रंगाचा टेम्पो (एमएच१४डीएम९५१३) वरील अज्ञात चालकाच्या विरोधात फिर्याद दिली आहे. तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी १७५/२०२३ भादवि कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८, ४२७, मोटर वाहन कायदा कलम प्रमाणे आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास सपोनि पांडे करीत आहेत.











