न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ ऑगस्ट २०२३) :- दारू पिण्यासाठी राहत्या घराची जमीन विकण्याचा वारंवार तगादा लावला. फिर्यादीच्या आरोपी जावयाने फिर्यादीच्या मुलीच्या चारीत्र्यावर वारंवार संशय घेतला.
तसेच तिला वारंवार मारहाण केली. तिचे जीवन जगणे कठीण करून तिला साडीच्या सहाय्याने गळफास घेवुन आत्महत्या करण्यास भाग पाडले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
महिला फिर्यादीने आरोपी जावई कृष्णा शिवाजी उकिरडे (वय ४० वर्षे रा. चिचोली ता. बार्शी जि सोलापुर, सध्या रा. सुस ता मुळशी जि पुणे) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
हिंजवडी पोलिसांनी आरोपीवर ८८८ / २०२३ भा.द.वि. कलम ४९८ (अ), ३०६ प्रमाणे गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली आहे. पुढील तपास पोउपनि गाढवे हे करीत आहेत.











