- सासऱ्याची जावयाविरोधात पोलिसात तक्रार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ ऑगस्ट २०२३) :- विनाकारण फिर्यादीच्या मुलीला आरोपी तिचा पती मारहाण करीत असताना मुलीच्या घरी झोपलेले फिर्यादी सासरे हे मुलीला वाचविण्यासाठी मध्ये आले. त्याचा राग आल्याने आरोपी जावयाने फिर्यादी सासऱ्यांच्या डाव्या कानावर हाताने मारहाण केली. तसेच त्यांना जिवे मारण्याची धमकी देत त्यांच्या डाव्या गालास व पाठीस जोरदार चावा घेऊन त्यांना जबर दुखापत केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. १) रोजी रात्री ००.१० च्या सुमारास फिर्यादीच्या मुलीच्या घरी चिंचवडमध्ये घडली. फिर्यादी शिवाजी लक्ष्मण कुचेकर यांनी आरोपी आदेश प्रकाश कुचेकर याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चिंचवड पोलिसांनी ३५७/२०२३ भा. दं.वि. कलम ३२५, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास मसपोफौ सनदी हे करीत आहेत.











