- विचारणा करताच तिघांची एकाला शिवीगाळ व दमदाटी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ ऑगस्ट २०२३) :- व्यवहार केलेली जमीन आधी कोणाला विकली?, अशी विचारणा फिर्यादी यांनी आरोपीला केली. त्याचा राग मनात धरत आरोपी तिघा जणांनी फिर्यादीच्या ऑफिसच्या बाहेर असलेले टेबल, खुर्ची, गेट, प्लॉटिंगचे ग्रील व झाडाचे नुकसान करून फिर्यादीला शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच सदरच्या जमीनीचा फिर्यादी यांच्याआधी एकाबरोबर करारनामा करून ती बाब अप्रामाणिकपणे लबाडीच्या इराद्याने फिर्यादी यांना माहिती न करता फिर्यादीची फसवणूक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. ०४/०७/२०२२ ते दि.०६/१०/२०२२ पर्यंत) परंदवडी, तालुका मावळ, जिल्हा पुणे येथील जमीन गट नंबर २७५ मधील १२० गुंठे जमीन या ठिकाणी घडला.
फिर्यादी प्रकाश बोदुराम चौधरी यांनी आरोपी संभाजी बाळु भोते, भरत बाळु भोते, बाळु महादेव भोते (सर्व रा. परंदवडी ता मावळ जि. पुणे) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
शिरगाव पोलिसांनी २०३/२०२३ भा.दं.वि कलम ४२०, ५०४, ५०६, ४२७,३४ प्रमाणे तिघांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पोउपनि येडे हे पुढील तपास करीत आहेत.











