न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ ऑगस्ट २०२३) :- पुणे जिल्हयातुन दोन वर्षांसाठी हद्दपार केलेले असताना देखील पोलिसांची कोणतीही परवानगी न घेता आरोपी शहरात आला. कोणताही परवाना नसताना त्यांने स्वतःजवळ लोखंडी कोयता बाळगला.
रस्त्यावर थांबून दहशत माजवताना पोलिसांच्या निदर्शनास आला. पोलिसांनी (दि. १) रोजी त्याला जिवनज्योती हॉस्पीटलजवळ, रुद्र कॉलनी, रहाटणी येथून त्याला ताब्यात घेतले.
पंकज हरिप्रसाद बाजुळगे (वय २५ वर्षे, रा. रहाटणी) असे अटक आरोपीचे नाव आहे. वाकड पोलीस ठाण्यात त्याच्यावर ७४५/२०२३ आर्म अॅक्ट कलम ४ सह कलम २५, महा पोलीस अधिनियम १४२, ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि पाटील पुढील तपास करीत आहेत.











