- तर, ‘पिंपरी-चिंचवड दर्शन’ बससेवेतून पर्यटनाचा आनंद लुटा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ ऑगस्ट २०२३) :- पिंपरी-चिंचवड दर्शन’ बस १ मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी सुरू केली होती. शहरातील नागरिकांसोबतच बाहेरील पर्यटकांचा प्रतिसाद मिळत आहे. पुणे शहरातून देखील पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. सुरुवातीला या सेवेकडे नागरिकांनी पाठ फिरवली होती. त्यामुळेही योजना गुंडाळावी लागणार अशी चिन्हे दिसत होती. मात्र, आता ‘पिंपरी चिंचवड दर्शन’ बसला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. शहरातील मोरया गोसावी मंदिर, प्रतिशिर्डी शिरगाव, इस्कॉन मंदिर, आळंदी, देहुगाव गाथा मंदिर अशा अनेक ठिकाणी पिंपरी-चिंचवड दर्शन’ पर्यटन बस शहरातील पर्यटकांना घडवत आहे.
गेल्या दीड महिन्यापासून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. शहरातील नागरिकांना सुटीच्या दिवशी विरंगुळा हवा असतो. त्यामुळे सुटीच्या दिवशी पिंपरी चिंचवड दर्शन’ बसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. बसमध्ये गाइड असतो, ज्या ठिकाणच्या स्थळाची माहिती सांगितली जाते. पीएमपीएलच्या माध्यमातून शहरातील शाळांनादेखील पत्रव्यवहार देणे सुरु आहे. जेणेकरून शाळेतील विद्यार्थ्यांना शहरातील पर्यटन केंद्राची माहिती मिळेल.
पिंपरी-चिंचवड दर्शन बसमध्ये सामूहिक गटाने ३३ प्रवासी असतील तर पाच पर्यटकांना तिकिटात सूट दिली जाते. तिकीट काढल्यानंतर दर्शन बस स्टॉपवर जाण्यासाठी पीएमपीएलच्या कोणत्याही बसमध्ये मोफत प्रवास करता येतो. तसेच बस पुन्हा माघारी परतल्यानंतरही घरी जाताना कुठल्याही बसमध्ये मोफत प्रवास करता येतो.
सुरुवातीला या मोहिमेला प्रतिसाद नव्हता. परंतु, नागरिकांना याबद्दल वर्तमानपत्र, न्यूज पोर्टल, सोशल मीडियाच्या माध्यमातून माहीत झाले. गेल्या दीड महिन्यापासून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. शहरातील नागरिकांना सुटीच्या दिवशी विरंगुळा हवा असतो. दर्शनसाठी आता पुणे शहरातूनदेखील फोनद्वारे पर्यटकांची विचारणा सुरू आहे. – उल्हास पानसरे, पर्यटन समन्वयक, ‘पिंपरी चिंचवड दर्शन बस…














