न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ ऑगस्ट २०२३) :- विहिरीत बसवलेल्या टान्सफार्मरचे नटबोल्ट अज्ञात चोरट्याने खोलून त्यातील अंदाजे २४० किलो वजनाच्या तांब्याच्या कॉईल चोरून नेल्या. ज्याची किंमत ७२,०००/- रुपये होती. तसेच अंदाजे ३०० ते ४०० किलो लिटर ऑईल सांडवून फिर्यादीचे नुकसान केले आहे.
हा प्रकार (दि. ३१/०७/२०२३ रोजी सायं ६.३० ते दि. ०२/०८/२०२३ रोजी दुपारी ३.०० वा.) च्या दरम्यान मौजे गोळेवाडी, ता. मावळ,जि. पुणे येथे घडला.
फिर्यादी विश्वास मधूकर दळवी (वय ५६ वर्ष धंदा शेती, रा. चिंचवडेनगर, चिंचवड) यांनी आरोपी अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी १८८/२०२३ भादवि कलम ३७९, ४२७ नुसार आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. पोहवा बांगर पुढील तपास करीत आहेत.














