न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ ऑगस्ट २०२३) :- अशोक लेलँड कंटेनरवरील चालकाने जुना मुंबई-पुणे हायवे रोडवर अविचाराने कंटेनर उभा केला होता. या कंटेनरच्या पाठीमागे गाडी थांबण्याबाबतचा रिफ्लेक्टर, त्रिकोणी स्टॉप बोर्ड न लावता कंटेनर उभा केला होता. तसेच कंटेनरची पार्किंग लाईट, इंडीकेटर न लावता हयगयीचे कृत्य केल्यामुळे हायवे रोडने जाणाऱ्या पॅजो अॅपे कंपनीच्या थ्री व्हीलर टेम्पोने कंटेनरला पाठीमागुन धडक दिली.
पॅजो अॅपे टेम्पोचा चालक नवनाथ भगवान लवटे हा अपघातात दुखापतग्रस्त होऊन त्यातच त्यांचा मृत्यू झाला. कंटेनरवरील चालक हा त्यांच्या मृत्युस कारणीभुत झाला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
पिंपरी पोलिसांनी आरोपी कंटेनर चालक सुभाष कुसुम लोदी याच्या विरोधात ८२७/२०२३, भा. दं. वि. कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८, मो.वा.कायदा कलम (१)/१७७,१३४/१७७ प्रमाणे १०४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि जाधव पुढील तपास करीत आहेत.














