- या तारखेपर्यंत करा ऑनलाईन अर्ज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ जुलै २०२३) :- पुणे जिल्हा परिषदेच्या विविध २१ संवर्गातील सरळसेवेतील रिक्त असलेली एक हजार रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यात सर्वाधिक आरोग्य सेवक (पुरुष- महिला) पदाचे तब्बल ६८८ जागा आहेत. तर सर्वात कमी रिगमन पदासाठी एक जागा आहे.
पुणे जिल्हा परिषदेतील रिक्त असलेल्या विविध २१ संवर्गातील रिक्त असलेल्या एक हजार जागांसाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारले जात आहेत. त्यात कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पादाचे ३३ जागा आहेत. स्थापत्य अभियांत्रिकी सहायक ५९, कंत्राटी ग्रामसेवक ३७, विस्तार अधिकारी (पंचायत) ३. आरोग्य सेवेक (महिला) ४३६, आरोग्य सेवक (४० टक्के) १२४, आरोग्य सेवक (५० टक्के) १२८, औषध निर्माण अधिकारी २५ प्रयोगशाळा तंत्रज्ञ ४, विस्तार अधिकारी (संख्याकी) २, वरिष्ठ सहायक ८, शिक्षण विस्तार अधिकारी २, पशुधन पर्वेक्षक ३०, कृषी विस्तार अधिकारी आणि कनिष्ठ लेखाधिकारी प्रत्येकी २, कनिष्ठ लेखाधिकारी ३ वरिष्ठ सहायक (लेखा) ९, कनिष्ठ सहायक (लेखा) १६, पर्यवेशिका ९, कनिष्ठ सहायक ६७ आणि रिगमन १ असे एकूण एक हजार पदे भरली जाणार आहेत.
आयबीपीएस कंपनीच्या वतीने भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ५ ते २५ ऑगस्टदरम्यान अर्ज करता येईल. ऑनलाइन अर्ज पुणे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर करावा लागणार आहे. उमेदवारांनी एकाच पदासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांतून अर्ज करू नये. असे अर्ज बाद ठरविले जातील. मात्र, वेगवेगळ्या पदांसाठी स्वतंत्रपणे अर्ज करण्याची मुभा आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी १ हजार, तर आरक्षित उमेदवारांसाठी ९०० रुपये अर्ज शुल्क आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) राहुल गावडे त्यांनी दिली.














