- उपनियंत्रक वैध मापन शाखेकडून आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ ऑगस्ट २०२३) :- सामान्य ग्राहकांना अचूक वजन व मापाने वस्तू अथवा सेवा देण्याच्या दृष्टीने सर्व व्यापारी, औद्योगिक प्रतिष्ठान तसेच इतर वजने मापे वापरकर्त्यांनी त्यांच्याकडील वजने, मापे व मानकांची पडताळणी व मुद्रांकन करून घ्यावे, असे आवाहन उप नियंत्रक वैध मापन शाखा पुणे यांनी केले आहे.
वैधमापन शास्त्र यंत्रणेमार्फत वजने मापे व मानके यांची पडताळणी व मुद्रांकनाची कामे केली जातात. काही उपयोगकर्ते हे त्यांच्याकडील वजन व माप यांची पडताळणी व मुद्रांकन करून न घेता वापर करत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.
अशा उपयोगकर्त्यांची माहिती संकलित करण्याकरिता वजने व मापे यांची दुरुस्ती करणाऱ्या परवानाधारकांना प्राधिकार पत्रे देऊन विहित नमुन्याप्रमाणे सर्वेक्षण करण्याकरिता वैधमापन शास्त्र यंत्रणेने प्राधिकृत केले आहे.