न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ ऑगस्ट २०२३) :- शहरात नव्याने आलेल्या तसेच शहर पोलिस दलातील पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक आणि उपनिरीक्षक पदावरील अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या झाल्या आहेत.
बदली झालेले पोलिस निरीक्षक (कुठून कुठे)..
रवींद्र जाधव (सायबर सेल, परिमंडळ दोन ते नियंत्रण कक्ष), ज्ञानेश्वर साबळे (देहूरोड पोलिस स्टेशन संलग्न नियंत्रण कक्ष ते देहूरोड वाहतूक विभाग), प्रदीप पाटील (सायबर सेल परिमंडळ एक ते नियंत्रण कक्ष), शहाजी पवार (दिघी) आळंदी वाहतूक विभाग ते नियंत्रण कक्ष), वर्षाराणी पाटील (वाहतूक विभाग ते चाकण वाहतूक विभाग), सतीश नांदूरकर (नियोजन वाहतूक विभाग ते दिघी आळंदी वाहतूक विभाग), मच्छिंद्र आदलिंग (चाकण वाहतूक विभाग ते हिंजवडी वाहतूक विभाग), स्पृहा चिपळूणकर (परकीय नोंदणी विभाग ते देहूरोड पोलिस स्टेशन), पूनम जाधव (चाकण पोलिस स्टेशन ते सायबर सेल, परिमंडळ एक), गणेश पवार (हिंजवडी वाहतूक विभाग- नियंत्रण कक्ष), चंद्रशेखर चौरे (महाळुंगे वाहतूक विभाग ते नियंत्रण कक्ष), नारायण पाटील (तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशन ते सांगवी पोलिस स्टेशन), गणेश लोंढे (पिंपरी पोलिस स्टेशन, संलग्न आर्थिक गुन्हे शाखा ते विशेष शाखा एक), विठ्ठल झांझुर्णे (आर्थिक गुन्हे शाखा ते भोसरी पोलिस स्टेशन), दत्तात्रय मोरे (आर्थिक गुन्हे शाखा ते जलद प्रतिसाद पथक), सतेज जाधव (आर्थिक गुन्हे शाखा ते जलद प्रतिसाद पथक), गिरीश नामदेव चामले (गुन्हे शाखा युनिट तीन ते नियंत्रण कक्ष), नव्याने हजर झालेले सहायक पोलिस निरीक्षक (पदस्थापनेचे ठिकाण) जितेश शिंगोटे (आर्थिक गुन्हे शाखा), लहू तावरे (नियंत्रण कक्ष), समीर वाघ (तळेगाव दाभाडे), वसंत देवकाते (विशेष शाखा एक), नव्याने हजर झालेले पोलिस उपनिरीक्षक (पदस्थापनेचे ठिकाण), प्रभाकर खणसे (देहूरोड पोलिस स्टेशन), हिरामण किरवे (दिघी पोलिस स्टेशन), राजाराम काकडे (वाहतूक शाखा), विद्या पाटील (गुन्हे शाखा), सागर पोमण (सायबर सेल), भारत माने (वाकड पोलिस स्टेशन), सचिन खताळ (वाहतूक शाखा), रेखा काळे (संगणक विभाग), रूपेश टेमगिरे (विशेष शाखा-१), अनिल डफळ (विशेष शाखा-१).















