न्यूज पीसीएमसी नेटवर्क
अहमदनगर (दि. ४ एप्रिल) :- भारतीय जनता पक्षाचे अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांची पत्नी धनश्री पाटील यांनी देखील, लोकसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
डॉ. सुजय विखे पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज २ एप्रिलला दाखल केला होता. त्यानंतर आज त्यांची पत्नी धनश्री पाटील यांनी सुजय विखे पाटील यांच्या लोकसभा निवडणूक अर्ज नामनिर्देशनात तांत्रिक आपत्ती आल्यास सावधगिरीचा उपाय म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
अहमदनगर लोकसभेसाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉ. सुजय विखे पाटील हे भाजपकडून आगामी लोकसभा निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे संग्राम जगताप मैदानात आहेत. त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.










