न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ ऑगस्ट २०२३) :-किन्हई शेलारवाडीला वीजपुरवठा होणाऱ्या कुंडमळा येथील डीपीवरील फ्यूज वारंवार बंद होत आहेत. याबाबत तक्रार करूनही महावितरणच्या इंदुरी कार्यालयाकडून फ्यूज बसवले जात नाहीत, अशी तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.
शेतकरी नितीन पिंजण म्हणाले, फ्यूज बसवले जात नसल्याने आम्ही स्वतः डीपी बॉक्समध्ये तारा जोडून वीजपुरवठा पूर्ववत करून घेत आहोत. डीपीमध्ये कट आऊटही बसविण्याची गरज आहे.’’
गेल्या एक वर्षांपासून कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी महावितरणकडे पाठपुरावा करत आहोत. मात्र, कर्मचारी, अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नाही. आमदार सुनील शेळके यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यांच्याकडून महावितरणला सूचना केल्या जातील अशी अपेक्षा नितीन पिंजण, श्रीकांत पिंजण, भारत माळी, रमेश लांडगे यांनी व्यक्त केली.
‘‘फ्यूज बंद झाल्यानंतर कर्मचारी पुन्हा बसवत असतात. फ्यूजची समस्या पूर्ण इंदुरी सेक्शनमध्ये आहे. त्याचे काम करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास पाठवला आहे. प्रस्ताव मंजूर होताच काम करण्यात येईल.’’ – प्रशांत पवार, कनिष्ठ अभियंता इंदोरी महावितरण कार्यालय…













