न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ ऑगस्ट २०२३) :- मोहननगर, चिंचवड येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले संस्थेच्या सौ जयश्री दिलीप निंबारकर प्राथमिक विद्यालय व माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अजिंठा नगरीतील हॅंडीकॅप सेंटर येथील अंध-अपंग बांधवांसोबत रक्षाबंधनाचा सण अतिशय उत्साहात साजरा केला.
विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विद्यालयात पार पडलेल्या “राखी निर्मिती प्रशिक्षणातून” तयार केलेल्या राख्या या कार्यक्रमात त्यांचे औक्षण करून बांधण्यात आल्या. हॅंडीकॅप सेंटर, अजंठानगरचे संस्थापक चोरडिया यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
त्याचप्रमाणे बालवर्ग, प्राथमिक, माध्यमिक विद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांनी वर्गातील विद्यार्थ्यांना औक्षण करून राख्या बांधल्या. यानिमित्ताने विद्यार्थ्यांना रक्षाबंधन व नारळी पौर्णिमेची माहिती सांगण्यात आली. त्याचप्रमाणे अध्यक्षा जयश्री निंबारकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना, पालकांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.












