- इमारतीला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील चौघांवर काळाचा घाला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० ऑगस्ट २०२३) :- पूर्णानगर येथील जून्या आरटीओ शेजारील पूजा हाईटस नावाच्या बिल्डींगमध्ये आज पहाटे आग लागली. या आगीत ४ जणांचा होरपळून मृत्यु झाला आहे.
आगीचे वृत्त समजताच अवघ्या काही मिनीटातच अग्निशमन दलाची वाहने त्वरीत घटनास्थळी पोहोचली. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.
पालिकेचे आयुक्त, अतिरिक्त आयुक्त यांनी त्वरित घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच वायसीएम रुग्णालयात जाऊन परिस्थितीची माहिती घेतली. मयत व्यक्तींचे पोस्ट मार्टम सुरू असून त्यातून मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, अशी माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली आहे.
मयत हे एकाच कुटुंबातील असून सदर कुटुंब हे राजस्थानमधील पाली जिल्ह्यातील आहेत. चिमणाराम बेणाराम चौधरी (वय 48 वर्ष), नम्रता चिमणाराम चौधरी(वय 40 वर्ष), भावेश चिमणाराम चौधरी (पुरुष वय 15), सचिन चिमणाराम चौधरी (वय 13 वर्ष) असे आगीत मृत्यु झालेल्या कुटुंबातील व्यक्तींची नावे आहेत.
आगीचे कारण अद्याप कुटुंबातील शकले नाही.












