न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० ऑगस्ट २०२३) :- चाकण इंडीस्ट्रियल एरियामधील कुरुळीतील सॅनी हेवी इंडस्ट्रि या कंपनीमध्ये (दि. २५ ते दि. २८) रोजी ९.०० वाजेच्या सुमारास एकुण ९१,९४,३७७ रुपये किंमतीचे ३९ एस्कावेटर कंट्रोल डिसप्ले पार्ट अज्ञात इसमाने कंपनीमध्ये अनाधिकाराने प्रवेश करुन चोरुन नेले आहेत.
याप्रकरणी फिर्यादी श्रीकांत विजयराव देशमुख यांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी अज्ञातावर ५२६/२०२३ भा.दं.वि. कलम ४५४, ४५७,३८० नुसार गुन्हा दाखल केला आहे.












