न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० ऑगस्ट २०२३) :- ऑनलाईन गाडी बुक करण्यासाठी वेबसाईटवर माहिती भरली. त्यावेळी अनोळखी मोबाईल नंबरवरून फिर्यादीला कॉल आला. राधे राधे ट्रॅव्हलसचा मॅनेजर बोलत असल्याचे खोटे सांगुन फिर्यादीला आरोपीने सुरवातीस अर्धे पैसे पाठविण्यास सांगितले. फिर्यादीने पाठवलेले पैसे मिळाले नसल्याचे खोटे सांगून व फिर्यादीच्या मोबाईलची स्क्रिन शेअर करण्यास भाग पडून फिर्यादीच्या एसबीआय व आयसीआयसीआय बँक खात्याच्या क्रेडीट कार्डवरुन एकुण रुपये १,८१,९४० परस्पर कट करुन घेवुन फिर्यादीची ऑनलाईन आर्थिक फसवणुक केली आहे, असे फिर्यादीत नमूद आहे.
ही घटना (दि. १५/१२/२०२२) रोजी रात्री १०.२५ वा. ते १०.३० च्या दरम्यान फिर्यादीच्या मोबाईलद्वारे ऑनलाईन पद्धतीने घडली. फिर्यादी पारस सुरेश अग्रवाल यांनी आरोपी १) मनोज नावाचा इसम मो.नं. ९६३८४३६९४० चा अज्ञात धारक २) आयडीएफसी बँक खाते नं. १०११०९८७५४२ धारक, ३) एचडीएफसी बैंक खाते नं. ५०२००७२१६७०३० धारक यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
वाकड पोलीस ठाण्यात ८४६/२०२३ भा.दं.वि कलम ४१९, ४२०, ३४ सह माहीती तंत्रज्ञान अधिनियम (सुधारीत) कायदा २००८ चे कलम ६६ (डी) प्रमाणे आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि जाधव पुढील तपास करीत आहेत.












