- लोखंडी कोयता जवळ बाळगून रस्त्यावर माजविली दहशत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ ऑगस्ट २०२३) :- पिंपरी चिंचवड व पुणे पोलीस आयुक्त, तसेच पुणे जिल्हयाच्या हद्दीतून दोन वर्षांसाठी आरोपीला हद्दपार केले आहे. तरीही आरोपीने पिंपरी चिंचवड पोलिसांची कोणतीही परवानगी न घेता शहरात प्रवेश केला. लोखंडी कोयता जवळ बाळगून रस्त्यावर थांबून दहशत पसरविली.
हा प्रकार (दि. ३०) रोजी सायं. ७.१० वाजता चौधरी पार्क रोडवर, वाकड येथे घडला. करण सुबेदार जैसवार (वय २५ वर्षे रा. गणेशनगर, वाकड) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
त्याच्यावर वाकड पोलीस ठाण्यात ८५१/२०२३ आर्म अॅक्ट कलम ४ सह कलम २५, महाराष्ट्र पोलीस अधिनियम १४२, ३७ (१) (३) सह १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोनि पाटील पुढील तपास करीत आहेत.







![[वाकड] :- तडीपार आरोपीची शहरात बेकायदेशीरपणे घुसखोरी..](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/08/images-20-90x60.jpeg)
![[वाकड] :- तडीपार आरोपीची शहरात बेकायदेशीरपणे घुसखोरी..](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/08/SAVE_20230831_102748-90x60.jpg)



