- अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाने महिलेला केले गजाआड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ ऑगस्ट २०२३) :- मोशी येथील स्पाईन रोड येथे आरोपी महिलेने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी दोन पिडीत महिलांना पैशांचे अमिष दाखवले. त्यांच्याकडुन वेश्या व्यवसाय करुन घेतला. त्यातून मिळालेल्या रकमेतून स्वतःची उपजिवीका भागवली.
पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्ष, गुन्हे शाखेने (दि. २९) रोजी रात्री ९.०५ वाजेच्या सुमारास कारवाई करून महिलेला ताब्यात घेतले आहे.
तिच्यावर भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात ३८८/२०२३ भा.दं.वि कलम ३७० (२) सह अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ४,५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वपोनि पंडित पुढील तपास करीत आहेत.







![[मोशी] :- स्पाईन रोडवर सुरु होता वेश्या व्यवसाय..](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/08/maxresdefault-1-90x60.jpg)
![[मोशी] :- स्पाईन रोडवर सुरु होता वेश्या व्यवसाय..](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/08/download-1-21-90x60.jpeg)



