न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ एप्रिल) :- आगामी लोकसभेच्या धर्तीवर शिवसेनेत अनेक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश घडवून आणला जात आहे. आज शनिवार (दि. ६) रोजी गुडीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर शिवसेनेचे युवराज दाखले यांच्या पुढाकाराने पिंपरी विधानसभेत जमिर शेख यांच्यासह अनेक हिंदू-मुस्लिम बांधवांनी शिवबंधन बांधुन शिवसेनेत प्रवेश केला.
मावळ लोकसभेवरती भगवा झेंडा फडकविणारच, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. त्यासाठी सज्ज रहा, असे मुस्लिम बांधवांकडुन वचन घेतले.
यावेळी शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले, प्रदेश सचिव गणेश आहेर, निलेश भोरे, मारूती मस्के, गोरख पाटील, माऊली जाधव आदी उपस्थित होते.










