न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे गुरव : मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ”मराठवाडा भूषण पुरस्कार वितरण” समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमास कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे, लातूरचे माजी आमदार शिवाजीराव कुवेकर, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे पक्षनेते एकनाथ पवार, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर, संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर व आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते डॉ. भाऊसाहेब जाधव यांना ”मराठवाडा भूषण जीवन गौरव” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच मधुकर तेलंग (प्रशासकीय), डॉ. रमेश जोशी (वैद्यकीय), भूषण कदम (सामाजिक), आण्णा जोगदंड (वृक्षसंवर्धन) आदींना मराठवाडा भूषण पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
पुरस्कार वितरण समारंभानंतर मराठवाड्याची कन्या कृष्णाई प्रभाकर उळेकर हिने ”अस्सल भारूड” ही मराठवाड्याची लोककला सादर केली.
इच्छाशक्तीच्या जोरावर सर्वोच्च स्थान पटकविलेल्या महान व्यक्तीमत्वाचा इतिहास भारुडाच्या माध्यमातून उलघडून सांगितला. दिवसेंदिवस मराठवाड्याला नैसर्गिक अपत्तीने कसे ग्रासले आहे. त्यामुळे मराठवाडा दुष्काळग्रस्त भाग कसा बनत चालला आहे. त्याला जबाबदार दुसरे कोणी नसून आपणच आहोत अशा प्रकारचे सामाजिक समस्यांचे मंथन कृष्णाई हिने भारुडाच्या माध्यमातून व्यक्त केले.
















