न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ ऑक्टोबर २०२३) :- पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील चार पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या झाल्या. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी मंगळवारी (दि. ३) रात्री उशिरा याबाबतचे आदेश दिले.
सांगवी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीराम पोळ यांची शिरगाव पोलिस ठाण्यात, वाकडचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) रामचंद्र घाडगे यांची सांगवी पोलिस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षक पदावर, शिरगावच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक वनिता धुमाळ यांची आर्थिक गुन्हे शाखेत तर विठ्ठल साळुंखे यांची नियंत्रण कक्षातून वाकड (गुन्हे) पोलिस ठाण्यात बदली केली आहे.













