- ड्रेनेज लाईन, काँक्रिटीकरणाचे काम सुरू…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ ऑक्टोबर २०२३) :- नेहरुनगर येथील वाघिरे टॉवर्स सोसायटीच्या रस्त्यावरील काँक्रेटिकरण आणि ड्रेनेजलाईचे काम सुरू करण्यात आले. त्यामुळे परिसरातील सुमारे दीड हजार रहिवाशांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे स्थानिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार हे काम हाती घेण्यात आले. त्याचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले. यावेळी वाघिरे टॉवर्स सोसायटीचे चेअरमन तुषार वाघिरे, सामाजिक कार्यकर्ते फारुक इनामदार, अशोक देशमुख, जावेद इनामदार, विजय जमदाडे, अजय जुनावणे, सचिन शिंदे, मंगेश कुलकर्णी आदी स्थानिक नागरिक उपस्थित होते.
भोसरी विधानसभा मतदार संघातील सोसायटीधारक, नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही कायम प्राधान्य दिले आहे. सोसायटीधारकांच्या समस्या सोडवण्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी आम्ही नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात केली होती. त्यामुळे सोसायटीधारकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून पूर्णवेळ अधिकारी नियुक्त केला आहे. नागरी समस्यांबाबत सोसायटीधारकांनी ‘परिवर्तन हेल्पलाईन- 93799 09090’ वर संपर्क करावा आणि आपली तक्रार नोंदवावी. त्या सोडवण्यासाठी आम्ही तत्पर आहोत.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.













