- मात्र, रक्ताचा रिपोर्ट यायला लागतोय आठवड्याचा कालावधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ ऑक्टोबर २०२३) :- शहरामध्ये व्हायरल आजारांची साथ आली आहे. त्यामुळे खासगी महापालिकेच्या रुग्णालयात गर्दी आहे. तेथे रक्ताची चाचणी करून रुग्णांवर उपचार करण्यात येतात. अहवाल येण्यासाठी सहा दिवस लागत असल्याचे समोर आले आहे. रुग्णालयासह शहरामध्ये महापालिकेची आठ मोठी रुग्णालये आहेत.
पिंपळे गुरव येथील महापालिका रुग्णालयात रुग्णाला सहा दिवसांनंतर रक्ताचा अहवाल घेण्यासाठी येण्यास सांगितले. मंगळवारी (दि. १०) सकाळी एक रुग्ण तपासणी करण्यासाठी पोहोचला. तेथे पोहोचल्यानंतर रक्ताची चाचणी करण्यासाठी सांगितले. त्यासाठी नमुने घेण्यात आले. त्यानंतर संबंधित रुग्णाला ‘सहा दिवसांनी अहवाल येईल, सहा दिवसांनी अहवाल घ्यायला या, असे सांगितले.
एवढ्या दिवसांनी अहवाल येत असून, या काळात रुग्णांची तब्येत आणखी बिघडण्याची शक्यता आहे. आजाराचे निदान लवकर होत नसल्याने उपचार काय करायचे याबाबत डॉक्टरही अनभिज्ञ असतात. अहवाल मिळणे गरजेचे आहे. महापालिकेच्या रुग्णालयांत राज्य शासनाने रक्त तपासणीचे काम ठेकेदार संस्थेला दिले आहे. हिंद लॅब्सच्या वतीने रक्ताचे नमुने घेऊन त्यांची चाचणी केली जाते. मात्र, त्याचा अहवाल देण्यासाठी सहा दिवसांचा वेळ लागत आहे. त्यामुळे रुग्णांना नाईलाजाने खासगी रुग्णालय गाठावे लागते. ज्या रुग्णांची खासगी रुग्णालयात जाण्याची परिस्थिती नसते, अशा रुग्णांची तब्येत आणखी खालावत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नातेवाईक चिंता करतात
शासनाने प्रयोगशाळा नेमली आहे. अहवालासाठी उशीर होत असल्याचे शासनाला कळवले आहे. – डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकरी…













