न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ ऑक्टोबर २०२३) :- दांडीया पाहत असताना फिर्यादीचा आरोपी पुतण्या याने हातात कोयता घेवुन येवुन फिर्यादीसह पती, मुलगी यांना शिवीगाळ केली. ‘ तुम्ही माझ्या बायकोला बोलता का? मी एकाएकाचे मर्डर पाडतो ‘ अशी धमकी दिली. हातातील कोयता फिर्यादीच्या पतीच्या डोक्यात पाठीमागील बाजुस मारुन त्यांना गंभीर जखमी केले. फिर्यादी या पतीला वाचविण्यासाठी मध्ये गेल्या असता त्यांचे केस ओढून त्यांना आरोपीने लाथाबुक्याने मारहाण केली. तसेच जाउ यांना देखील लाथाबुक्याने मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. १६) रोजी रात्री १०.१५ च्या सुमारास वेताळबुवा, मोरया हौसिंग सोसायटी, वेताळनगर चिंचवड येथे घडली. महिला फिर्यादीने आरोपी ज्ञानेश्वर दशरथ शिंदे (रा. वेताळनगर झोपडपटटी, चिंचवड) याच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
चिंचवड पोलिसांनी आरोपीच्या विरोधात ४८८/२०२३ भा. दं.वि कलम ३२६, ५०४, ५०६, आर्म अॅक्ट- कलम ४ (२५) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि झडते पुढील तपास करीत आहेत.















