न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ ऑक्टोबर २०२३) :- देशा देवा धर्माच्या, राष्ट्राच्या, संस्कृतीच्या, हिंदुत्वाच्या, सत्व स्वाभिमानाच्या, अस्मितेच्या बाबतीत कमालीचा उदासीन आणि निद्रिस्त होत चाललेला आहे.
हिंदु समाज या सर्व गोष्टींसाठी खडबडुन जागे करण्यासाठी व आई भवानीचा आशिर्वाद मागण्यासाठी कुदळवाडी येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान च्या वतीने दुर्गामाता दौडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी स्वीकृत नगरसदय दिनेश यादव आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करून महाराज व ध्वजास पुष्पहार घालून सर्वांना शुभेच्छा देऊन पाचव्या माळेच्या पुष्पाची सुरवात करण्याचे सौभाग्य शिवप्रतिष्ठानचा वतीने एक धारकरी म्हणुन मला लाभले, अशी प्रतिक्रिया यादव यांनी दिली.

















